कांद्यानं रडवलं, टोमॅटोनं रस्त्यावर आणलं, तर मिरचीला कवडीमोल भाव; शेतकरी कुठं होतोय हातबल?
नाशकात कांदा आणि टोमॅटोचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे कांद्यासह टोमॅटोचे भाव हे कोसळले आहेत. त्याचच शेतकऱ्यांना आधार असणाऱ्या मिरचीने देखील आता साथ सोडली आहे. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. नाशकात कांदा आणि टोमॅटोचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे कांद्यासह टोमॅटोचे भाव हे कोसळले आहेत. त्याचच शेतकऱ्यांना आधार असणाऱ्या मिरचीने देखील आता साथ सोडली आहे. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे. तर आता शेती करायची तरी कशी आणि पिकवायचं तरी काय असा सवाल शेतकऱ्याकडून होत आहे. कांदा, टोमॅटोनंतर मिरचाच्या बाजारभावात घसरण होत असल्याने मिर्ची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार जातीची मिरचीची लागवड केली होती. त्याकरता त्यांनी सात ते साडेसात हजार रुपये लाव लावून त्याला मल्चिंग पेपर व बांबू यासह रासायनिक खते असा एकूण दोन ते अडीच लाख रुपये त्यांना उत्पादनासाठी खर्च आला होता. मात्र ज्यावेळेस मिरची निघण्यास सुरुवात झाली त्याला बाजारात 10 ते 15 रुपये भाव मिळू लागल्याने अक्षरशः या शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च देखील निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.