भास्कर जाधव यांचा मनसेला टोला; मनसेच्या विडंबनावर प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांची योग्यताच…’
मुलाखतीच्या पहिल्या भागातून उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून भाजपसह शिंदे गटाने खिल्ली उडवली होती. तर ठाकरे यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती.
मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक प्रखर मुलाखत प्रसिद्ध झाली. मुलाखतीच्या पहिल्या भागातून उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून भाजपसह शिंदे गटाने खिल्ली उडवली होती. तर ठाकरे यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विडंबन करण्यात आलं. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंची मिमिक्री केली. त्यावरू आता राजकारण जोरदार गरम होत आहे. यावरूनच शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी जाधव यांनी मनसेला फक्त मिमिक्री करायला, टिंगलटवाळी करायला जमतं असा टोला लगावला आहे. तर महाविकास आघाडीचे सरकार आणायचं आसा निर्धार ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणी टिंगलटवाळी करतोय, कोण चेष्टा करतोय, त्यांची कुवतच तेवढी. त्यांची योग्यताच तेवढी असाही टोला लगावला आहे.