आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेवरून शिरसाट यांचे ठाकरे यांच्यावर आरोप; बाळासाहेबांच्या सहाय्यकाचे उत्तर

| Updated on: Aug 02, 2023 | 10:35 AM

तसेच त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप देखील केले होते. त्यावरून ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांनी सामनातील दिघे यांच्या अत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | आनंद दिघे यांचा अपघातानंतर मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती का आला नव्हता? का उपस्थित नव्हता असा सवाल शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप देखील केले होते. त्यावरून ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यांनी सामनातील दिघे यांच्या अत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानी स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्यांना एक खणखणीत चपराक असं म्हटलं होतं. त्यानंतर आता यावरूनच बाळासाहेब ठाकरे यांचे तत्कालिन सहाय्यक असणारे मोरेश्वर राजे यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. तसेच दिघेंच्या अंत्यविधीवेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते असे म्हटलं आहे. त्याचबरोबर शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 02, 2023 10:35 AM
“महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आडवं पाडलं पाहिजे”; बच्चू कडू यांची संभाजी भिडे यांच्यावर टीका
सिनेसृष्टीत शोककळा; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं जीवन