अखेर अण्णा हजारे बोलले; पण त्यावरही राऊत यांचा टोला, म्हणाले, ‘मागणीनंतर अण्णांनी थेट…’
अशी घटना मानवतेला लागलेला कलंक आहे. 'स्त्री ही आपली आई आणि बहीण आहे. तिच्याबद्दल असे घृणास्पद कृत्य सहन करण्यापलीकडे आहे. सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करणाऱ्या अशा व्यक्तीच्या पत्नीवर आरोपींनी क्रूर कृत्य केलं.
मुंबई, 23 जुलै 2023 | मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, दोषींना फाशी झालीच पाहिजे. अशी घटना मानवतेला लागलेला कलंक आहे. ‘स्त्री ही आपली आई आणि बहीण आहे. तिच्याबद्दल असे घृणास्पद कृत्य सहन करण्यापलीकडे आहे. सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करणाऱ्या अशा व्यक्तीच्या पत्नीवर आरोपींनी क्रूर कृत्य केलं. ही अत्यंत गंभीर घटना आहे. मानवतेवर मोठा कलंक असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. यावेळी राऊत यांनी, “गेले काही दिवस अण्णा बोलतील, अशी मागणी आम्ही करत होतो. मात्र, आता अण्णांनी थेट मणिपूरच्या विषयालाच हात घातला आहे. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. पण, अण्णांची ओळख भ्रष्टाचार विरोधी म्हणून आहे. आज महाराष्ट्रात काय सुरूय? येथे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने पुराव्यासह केले, ते सगळे आज शपथ घेऊन मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे आता अण्णा हजारे यांच्याकडे राऊत यांनी कोणती मागणी केली ते पाहा…