Ajit Pawar On BJP | दुसऱ्या पक्षानं काय भूमिका घ्यावी हे त्यांनी पहावं : अजित पवार
शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले त्याचे रक्षण संभाजी महाराज यांनी केले आहे त्यामुळे त्यांना मी स्वराज्य रक्षक म्हणालो. त्यात मी अपशब्द वापरलेला नाही. मी माझी भूमिका मांडली. त्यामुळे दुसऱ्या पक्षानं काय भूमिका घ्यावी हे त्यांनी पहावं
मुंबई : अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत झालेल्या गदारोळावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणावं की स्वराज्यरक्षक हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. त्याच बरोबर पवार यांनी दुसऱ्या पक्षानं काय भूमिका घ्यावी हे त्यांनी पहावं असा टोलाही भाजपला लगावला आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. तसेच भाजपणे पवार यांचा राजीनामाही मागितला. त्यावर आपण कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नसल्याचे त्यांनी म्हटलं.
तसेच आपण आधीपासून शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले त्याचे रक्षण संभाजी महाराज यांनी केले आहे त्यामुळे त्यांना मी स्वराज्य रक्षक म्हणालो. त्यात मी अपशब्द वापरलेला नाही. मी माझी भूमिका मांडली. त्यामुळे दुसऱ्या पक्षानं काय भूमिका घ्यावी हे त्यांनी पहावं