Ajit Pawar On BJP | माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही
अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटल्यानंतर आज त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमीकेवर ठाम आहे असे म्हणत पवार म्हणाले.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. यानंतर पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका मांडली. तसेच आपण कधीच महापुरुषांबाबात चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा अधिकार भाजपला नाही. मला विरोधीपक्ष नेते हे पद माझ्या पक्षाने दिलं आहे. असेही त्यांनी खुलासा केला.
अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे वाद पेटल्यानंतर आज त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. तसेच आपण महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल कधीही चुकीचा बोललो नाही. मी माझ्या भूमीकेवर ठाम आहे असे म्हणत पवार म्हणाले. तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा स्वतंत्र्य अधिकार असतो, असेही ते म्हणाले.
तसेच यावेळी पवार यांनी आपण जे काही बोललो आहे ते इतिहासाच्या आधारावर विधानसभेत बोललो. संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणायला हवं. असं आपली भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदरांवर कारवाई कधी करणार असा सवाल ही त्यांनी भाजपला विचारला आहे.