संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक आक्रमक; केसरकर म्हणतात, ‘भिडे आणि भाजपचा संबंध’

| Updated on: Jul 29, 2023 | 3:29 PM

अमरावतीमध्ये महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहे असं वक्तव्य भिडेंनी केलं असून त्यावरून आता नवा वाद पेटला आहे. यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

छत्रपती संभाजीनगर, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यांनी अमरावतीमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. यावेळी अमरावतीमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असून करमचंद गांधी त्यांचे खरे वडील नाहीत. तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे वडिल आहे असं वक्तव्य भिडेंनी केलं असून त्यावरून आता नवा वाद पेटला आहे. यावरून काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांचे आणि भाजचा संबंध काय असा सवाल उपस्थित केला होता. तर केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर भिडेंवर अमरावतीत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भिडे गुरुजी स्वतंत्र आहेत, ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही असे केसरकर यांनी म्हटलं आहे. तर ते मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती देतात. त्यांच्या आणि पक्षाचा काही देणंघेणं नाही. त्यांच वक्तव्य चुकीचे आहे. गृहखात यावर चौकशी करून आवश्यक ते निर्णय घेईल असंही केसरकर यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Jul 29, 2023 02:39 PM
नाशिक-पुणे महामार्ग आहे की वाळवंट? काही कळेनाच… जीव मुठीत धरून प्रवासी करताय प्रवास
‘उबाठाने नाणारला विरोध करुन पाकला मदत केली?’, भाजपच्या बड्या नेत्याची आगपाखड