Sangram Jagtap | ‘नामांतरापेक्षा अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करा’ : संगराम जगताप
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनावरून देखिल वाद समोर येत आहे. तर यावरून राष्ट्रवादीचे आमदार संगराम जगताप आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आमने-सामने आले आहेत
राज्यात सध्या वादाचेच वातावरण तयार होताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याचदरम्यान आता अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनावरून देखिल वाद समोर येत आहे. तर यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपचे खासदार आमने-सामने आले आहेत
क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरणाचा वाद काही नवा नाही. त्यातच आता विभाजनचा वाद उफाळून येत आहे. नामांतरणापेक्षा विभाजनच करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संगराम जगताप यांनी केलं आहे.
तर त्यांच्या मागणीवर टीका करताना खासदार सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासी यांच काही घेण-देण नाही यामुळेच विभाजनाची मागणी केलं जात असल्याचं म्हटलं आहे
Published on: Jan 02, 2023 07:52 PM