राजीनाम्यानंतर डॅा. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केले कारण; म्हणाले, ….’म्हणून आम्ही राजीनामा’

| Updated on: Jun 01, 2023 | 7:46 AM

राजीनामा दिलेल्यांमध्ये माजी विभागप्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांचाही सहभाग आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : जे जे रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्यांमध्ये माजी विभागप्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांचाही सहभाग आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर जे जे रुग्णालयासह राज्यातील अरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या राजीनामा प्रकरणानंतर डॉ. तात्याराव लहाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी, सहा महिन्यापूर्वी रुजू झालेले निवासी डॉक्टर मोती बिंदूची शस्त्रक्रिया करू दिली जात नाही असे सांगून आमची तक्रार करत आहेत. मूळात या शस्त्रक्रिया टप्या टप्याने केल्या जातात. आमच्याकडे सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं. तरी आमच्यावर खोट्या तक्रार करण्यात आल्या आहेत. आमच्याविरोधात चौकशी नेमण्यात आली. चौकशी अधिकाऱ्यांच्या बदली करा अशी आमची मागणी होती. मात्र प्रशासनाने एकाच बाजूने चौकशी केली. तर प्रशासनाकडून या विभागाला कसलीही मदत मिळत नाही. उलट आता या खोट्या तक्रारींना आम्ही कंटाळलोय. गेली 30 वर्ष आम्ही काम केलं, आमच्यावर विश्वास न दाखवता 6 महिन्यापूर्वी आलेल्या डॅाक्टरांवर विश्वास दाखवला. मग आम्ही इथे काम करून काय उपयोग? म्हणून आम्ही राजीनामा दिला.

Published on: Jun 01, 2023 07:46 AM
जे. जे. रुग्णालयात राजीनामा बाँम्ब, नऊ डॉक्टरांचे राजीनामे, डॉ. लहाने यांच्याही समावेश
Special Report | रुपाली चाकणकर यांना आमदार व्हावसं वाटतंय, पण तिकीट कोण देणार?