Eknath Khadase | राष्ट्रवादी काँग्रेसने मला न्याय दिला
जो भाजप ब्राम्हणांचा म्हटला जायचा त्याला आम्ही बहुजनांचा केला, तशी ओळख निर्माण केली. मात्र त्याच भाजपने आमच्यावर आरोप केले. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि आज मला न्याय मिळाला.
मुंबईः राज्यसभा निवडणुकीवरून (Rajyasabha Election)महाराष्ट्रात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे दोनव मतं बाद होण्याची शक्यता आहे. कारण मलिक आणि देशमुख यांचा अर्ज कोर्टाने फेटाळला आहेत. त्यातच उद्या काय होणार कोणाचे खासदार होणार याकडे लक्ष सगळ्यांचेच लागले आहे. याच दरम्यान आता विधान परिषदेच्या निवडणूकांनाही जोर आला आहे. विधान परिषद निवडणुक हा 20 जून रोजी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची नावे जाहीर केली. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यात भाजपचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला. जो भाजप ब्राम्हणांचा म्हटला जायचा त्याला आम्ही बहुजनांचा केला, तशी ओळख निर्माण केली. मात्र त्याच भाजपने आमच्यावर आरोप केले. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि आज मला न्याय मिळाला.