UDDHAV THACKERAY : उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ, पक्षानंतर आता ‘मशाल’ही वादात
उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षप्रमुख पद वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले असतानाच आता त्यांच्या गटाला देण्यात आलेले मशाल चिन्हही अडचणीत आले आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE ) यांच्यासह ४० आमदार, १३ खासदार यांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKERAY ) यांचे पक्षप्रमुख पद धोक्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ( CENTRAL ELECTION COMMISSION ) केली आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह दिले होते. मात्र, या चिन्हावर समता पार्टीने आपला दावा सांगितला होता. याविरोधात समता पार्टीने दाखल केलेल्या दोन याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता समता पार्टीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. आपल्या पक्षाला देण्यात आलेले ठाकरे गटाला देण्यात देऊ नये अशी मागणी करणारी याचिका समता पार्टीकडून सर्वोच्च न्यायालयात दोन दिवसात दाखल केली जाणार आहे.