VIDEO | कायदा आणि व्यवस्थेवरून शरद पवार याचं पोलीस दलाबाबत सुचक वक्तव्य; तर सरकारवर निशाना
पवार यांनी यावरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पवार यांनी यावरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणत्याही घटनेवर मत मांडण्याचा देशाच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आणि धमक्या देऊन जर कोणाचा आवाज बंद करू शकेल असे कोणाला जर वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आपल्याला धमकीची चिंता नाही. आपला राज्यातील पोलीसांवर विश्वास आहे असे पवार यांनी नमूद केले. तसेच कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी याची काळजी घ्यावी. राज्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखणे याची जबाबदारी सरकारवर आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 09, 2023 05:11 PM