समीर वानखेडे यांचं निलंबन होणार? सीबीआय कार्यालयात जाण्याआधी म्हणाले…

| Updated on: Aug 02, 2023 | 2:49 PM

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी शनिवारी सिध्दिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. समीर वानखेडे यांची शनिवारी सीबीआयकडून 5 तास चौकशी झाली आहे.

मुंबई : एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी शनिवारी सिध्दिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. समीर वानखेडे यांची शनिवारी सीबीआयकडून 5 तास चौकशी झाली आहे. या चौकशीनंतर वानखेडे सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. दरम्यान सीबीआयकडून आजही समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात येत आहे. आज सकाळी 11.00 वाजता पुन्हा एकदा त्यांना सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. समीर वानखेडे हे त्यांच्या घरातून सीबीआय कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.यावेळी त्यांनी, मी सीबीआयच्या तपासात सहकार्य करत असल्याचे सांगितले. माझा सीबीआय आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, मला न्याय मिळेल.मी जिंकणार ही, असा विश्वार समीर वानखेडे यांनी दाखवला’.

 

Published on: May 21, 2023 12:38 PM
Maharashtra Politics : मुख्यमंत्री-माजी राज्यपाल भेटीवर राऊत भडकले; म्हणाले, ‘दोन घटनाबाह्य व्यक्ती’
Maharashtra Politics : कोश्यारी यांनी कायद्याचा आणि घटनेचा गैरवापर केला; संजय राऊत यांची सडकून टीका