Special Report : अगर तू ठाकरे हैं, तो मैं भी राणा हूँ, नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना ललकारले

| Updated on: Sep 06, 2022 | 10:01 PM

यावर चंद्रकांत खैरे यांनी त्यांना प्रत्यूत्तर दिलं.सिगारेट पिऊन ती बाई, अशी दाखवते.ती बाई आम्हाला शहाणपणा शिकविते का, असा सवालही खैरे यांनी विचारला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झालाय. यातच अमरावतीच्या राणा दाम्पत्यानंसुद्धा उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणं सुरू केलंय. जळगाव येथे बोलताना नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला. शिवसेनेला थेट आव्हान दिलंय. अगर तू ठाकरे हैं तो मैं भी राणा हूँ, अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना ललकारलं. माध्यमांचे कॅमेरे समोर येताच राणा दाम्पत्याचं टार्गेट उद्धव ठाकरे हेच असतात. काल जळगाव येथे सामूहिक हनुमान चालिसाचं पठण राणा दाम्पत्यानं केलं. हे झाल्यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्याच नावाचा जप सुरू केला.यावर चंद्रकांत खैरे यांनी त्यांना प्रत्यूत्तर दिलं.सिगारेट पिऊन ती बाई, अशी दाखवते.ती बाई आम्हाला शहाणपणा शिकविते का, असा सवालही खैरे यांनी विचारला.

Published on: Sep 06, 2022 10:01 PM
Special report : शिंदे गट आणि मनसे युतीसाठी हालचाली? नव्या युतीवरून ‘राज’ की बात!
Video: BMC निवडणुकीसाठी भाजपचे हैद्राबाद पॅटर्न, जागावाटप दिल्लीत ठरणार- सूत्र