अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा; अज्ञात कार अचानक ताफ्यात घुसली, एकच खळबळ

| Updated on: Mar 09, 2023 | 8:37 AM

Union Home Minister Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पाहा नेमकं काय घडलंय...

आगरताळा, त्रिपुरा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचं समोर आलं आहे. अमित शाह यांच्या ताफ्यात अचानकपणे अज्ञात कार घुसली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्रिपुरामधील आगरताळ्यात ही घटना घडली आहे. गेस्ट हाऊसपासून आगरताळा विमानतळाकडे ताफा जात असताना ही कार घुसली. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने कार ताफ्याकडे वळवली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्रिपुरा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीही याची दखल घेतली आहे.

Published on: Mar 09, 2023 08:37 AM
MahaFast News 100 | शरद पवारांचा भाजपला नागालँडमध्ये हादरा
शेतकरी उद्ध्वस्त झाला, सरकार भांग ढोसून पडले!; सामनातून शिंदे-फडणवीसांवर शाब्दिक हल्ला