आक्रमकता ही कृतीतून दिसावी लागते, संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला
आजची सभा ऐतिहासिक ठरणार आहे, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम होईल, आजच्या सभेने संपूर्ण देशाला मॅसेज जाईल. भडकावू भाषण करणं आणि दोन धर्मात भांडणं लावणं हे ओवैसी बंधुचं काम आहे.
आजची सभा ऐतिहासिक ठरणार आहे, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम होईल, आजच्या सभेने संपूर्ण देशाला मॅसेज जाईल. भडकावू भाषण करणं आणि दोन धर्मात भांडणं लावणं हे ओवैसी बंधुचं काम आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स पाळाव्या. आम्ही आमचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. संजय राऊत यांच्या वक्तव्यावकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. कुत्रा आपल्याला चावायला आला म्हणून आपण कुत्र्याला चावत नाही. आक्रमकता ही कृतीतून दिसावी लागते, शिवसेनेची आक्रमकता हे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत अशी टीका संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवरती केली आहे.