Shivsena, NCP Protest | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मविआ आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन -tv9
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून 'मविआ'कडून राज्य सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा देण्यात येत आहेत. यावेळी 'ईडी सरकार हाय हाय' अशी घोषणाबाजी करण्यात येत असून अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी होत आहे.
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. तर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतील अशी शक्यता आहे. तर हे शिंदे सरकारचं पहिलंच अधिवेशन असून यात विरोधक सरकारला घेरण्याचा एकही मुद्दा सोडणार नसल्याचेच दिसत आहे. अधिवेशन सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ‘मविआ’ आक्रमक झाल्याचे पहायाला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ‘मविआ’कडून राज्य सरकारविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा देण्यात येत आहेत. यावेळी ‘ईडी सरकार हाय हाय’ अशी घोषणाबाजी करण्यात येत असून अतिवृष्टीग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी होत आहे.
Published on: Aug 17, 2022 11:56 AM