शरद पवार यांच्या घराबाहेरील आंदोलन दुर्दैवी – संजय राऊत
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरघळले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या घराबाहेर जमून आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दगड आणि चपला देखील फेकल्या. यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरघळले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या घराबाहेर जमून आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दगड आणि चपला देखील फेकल्या. यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. विलनिकरण न होण्याला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान आता या आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्या घरासमोर जो प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.