Satara NCP Protest | राष्ट्रवादीच्या वतीने अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त

| Updated on: Jun 20, 2022 | 9:39 PM

अग्निपथ योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

सातारा : अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशात विरोध होत असून ती मागे घ्यावी असा दबाव केंद्र सरकारवर विरोधी पक्षांकडून वाढविण्यात येत आहे. तर तरूणांकडून ही या योजनेला प्रखरविरोध करण्यात येत आहे. तसेच अनेक ठिकाणी जाळपोळीचा प्रकार ही होत आहेत. तर चक्काजाम ही केला जात आहे. याच दरम्यान या योजनेवरून साताऱ्यातही आंदोलन करण्यात आले. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्राच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी सातारा पोलिसांनी (Satara Police) चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

 

Gopichand Padalkar | ‘मविआला पराभव समोर दिसत असल्यानं रडीचा डाव खेळत आहेत’-tv9
Satej Patil | टिळक आणि जगताप यांच्या मतदानावरून काँग्रेसचा अक्षेप : सतेज पाटील – tv9