नाशिकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बाजचं न्यारा; मतदार राजा थेट पंचतारांकित हॉटेलात

| Updated on: Apr 28, 2023 | 1:28 PM

शेतकरी विकास पॅनलने शक्कल लढवत आपल्या मतदारांना चक्क पंचतारांकित हॉटेल दाखवलं आहे. तर 200 हुन अधिक मतदारांची पॅनलने येथे राहण्याची सोय केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील एकूण 11 कृषी उत्पन्न बाजार समित्यासाठी मतदान (Agricultural Produce Market Committee) प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी एकूण 13 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजेपासून मतदान होणार आहे. तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Nashik Agricultural Produce Market Committee) नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पेठ या तीन तालुक्यांमध्ये विस्तार असल्याने प्रचारासाठी मतदारांपर्यंत पोहचणे कठीण जात आहे. यामुळे शेतकरी विकास पॅनलने (Farmer Development Panel) शक्कल लढवत आपल्या मतदारांना चक्क पंचतारांकित हॉटेल (Five Star Hotel) दाखवलं आहे. तर 200 हुन अधिक मतदारांची पॅनलने येथे राहण्याची सोय केली आहे. तर त्यांना नेण्यासाठी खास बसची सोय देखील करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत सदस्याना पंचतारांकित थांबवल जात तसचं येथे झालं आहे. त्यामुळे नाशिकच्या या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला ग्लॅमर आणि महत्त्व प्राप्त झालं आहे.

Published on: Apr 28, 2023 12:34 PM
ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती मिळणार की नाही? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली; काँग्रेसच्या नेत्याचा सरकारवर निशाणा