अमरावतीत कोणी गट राखला? खासदार बोंडे यांच्या करिष्मा चालला?…; काय झालं मविआचं?
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल ही आला आहे. जेथे धक्कादायक निकाल आले आहेत. अमरावतीत 12 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार होत्या. त्यापैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या तर 5 समित्यांचा निकाल हाती आला.
अमरावती : राज्यातील 147 बाजार समित्यांच्या निवडणुका (Agricultural Produce Market Committee Election) पार पडल्या. आज निकाल लागत आहे. त्यामुळे अनेक बाजार समिती परिसरात गुलाल आता लागण्यास सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी संमिश्र निकाल लागले आहेत. काही ठिकाणी शिंदे गट (Shinde Group) आणि राष्ट्रवादी युतीचा विजय झला आहे. तर कुठे भाजप आणि कुठे काँग्रेस-ठाकरे गटाचा (Congress-Thackeray Group) विजय झाला आहे. अशातच आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल ही आला आहे. जेथे धक्कादायक निकाल आले आहेत. अमरावतीत 12 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार होत्या. त्यापैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या तर 5 समित्यांचा निकाल हाती आला. यावेळी भाजप खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांच्या पॅनलचा अमरावतीच्या मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन जागांनी पराभव. तर 5 पैकी 4 कृषि उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तिवसा, मोर्शी, चांदुर रेल्वे, अंजनगाव सुर्जी बाजार समितीवर मविआचा झेंडा लागला आहे.