कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आनखी एका घोटाळ्याचा आरोप; तब्बल 150 कोटींचा टेंडर घोटाळा
टीइटी प्रकरणात देखील त्यांच्या मुलाचं नाव आल्यानं ते अडचणीत सापडले होते. त्यानंतर ते आता अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीमुळे चर्चेत आले आहेत. तर या धाडी खंडणीसाठी घातलेल्या होत्या अशा चर्चा सुरू आहेत.
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे सतत घोटाळ्यांनी नाव जोडलं जात आहे. याच्या आधी त्यांच नाव वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीचं प्रकरणात आलं होतं. त्यानंतर टीइटी प्रकरणात देखील त्यांच्या मुलाचं नाव आल्यानं ते अडचणीत सापडले होते. त्यानंतर ते आता अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीमुळे चर्चेत आले आहेत. तर या धाडी खंडणीसाठी घातलेल्या होत्या अशा चर्चा सुरू आहेत. यामध्येच आता पुन्हा एकदा त्यांच्यावर मर्जीतील दोन कंपन्यांच्या घशात तब्बल 150 कोटी रुपयांचे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’त हा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून ऑर्गेनिक कीटकनाशक खरेदीसाठी काढण्यात आलेल्या 150 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. निविदेतील अटी, शर्ती बासनात गुंडाळून सत्तार यांच्या मर्जीतील कंपनीच्या घशात हे कंत्राट घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळं आधीच गोत्यात आलेल्या अब्दुल सत्तार यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.