‘आपला बळीराजा संकटात, मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही’; धनंजय मुंडे यांचा निर्णय
धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांच्याबरोबर गेलेत. त्यांचा देखील अजित पवार यांचा शपथविधी मंत्रिमंडळ विस्तारावेळी झाला. पण १० ते १२ दिवस ओलांडूनही खाते वाटप झालं नव्हतं. पण याचाही काल निर्णय झाला आणि धनंजय मुंडे यांना कृषी खातं मिळालं.
बीड : काही दिवसांपुर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली. यावेळी त्यांच्याबरोबर अनेक आमदार गेले. तर मोजकेच आमदाक हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. यावेळी धनंजय मुंडे हे देखील अजित पवार यांच्याबरोबर गेलेत. त्यांचा देखील अजित पवार यांचा शपथविधी मंत्रिमंडळ विस्तारावेळी झाला. पण १० ते १२ दिवस ओलांडूनही खाते वाटप झालं नव्हतं. पण याचाही काल निर्णय झाला आणि धनंजय मुंडे यांना कृषी खातं मिळालं. यानंतर त्यांनी आपल्या वाढदिवसावरून मोठा निर्णय घेताना, राज्यातील पावसाची स्थिती पाहता आणि बीडमधील स्थिती पाहता आपण बळीराजाच्या सोबत आहे. त्यामुळे मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही अशी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी, बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही. तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षीचा वाढदिवस मी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो अशी भावनीक साद घातली आहे.