देशात पहिल्यांदाच 38 दोषींना फाशीची शिक्षा

| Updated on: Feb 18, 2022 | 12:30 PM

एका तासात 21 बॉम्बस्फोट (bomb blast) घडवल्याप्रकरणी 49 पैकी 38 दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 8 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवले होते.

अहमदाबादमध्ये जुलै 2008मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Ahmedabad serial bomb blast case) निकाल आला आहे. एका तासात 21 बॉम्बस्फोट (bomb blast) घडवल्याप्रकरणी 49 पैकी 38 दोषींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 8 फेब्रुवारी रोजी विशेष न्यायालयाने या आरोपींना दोषी ठरवले होते. तर 28 जणांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. याप्रकरणी स्पेशल कोर्टात (special court) 13 वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर आज या प्रकरणाचा निकाल आला आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणावर दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.

Mumbai | महानगरपालिका करणार नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी
सुधीर जोशी यांचं अंतिम दर्शन घेताना रश्मी ठाकरे यांचे डोळे पाणावले