गौतमी पाटीलवरून महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? ज्येष्ठ तमाशा कलावंताचा संतप्त सवाल
बीदागिवरूनच काही दिवसांपुर्वीच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका करताना, तीन गाण्याला तीन लाख देता. मात्र आम्ही पाच हजार रुपये वाढवून मागितले तर प्रश्न कसले विचारता असा सवाल केला होता
अहमदनगर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असते. आधी नृत्यवरून तर आता बीदागिवरून तिची चर्चा होताना दिसत आहे. बीदागिवरूनच काही दिवसांपुर्वीच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका करताना, तीन गाण्याला तीन लाख देता. मात्र आम्ही पाच हजार रुपये वाढवून मागितले तर प्रश्न कसले विचारता असा सवाल केला होता. सध्या हा वाद सुरू असतानाच आता महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा थेट संतप्त सवाल राजकर्त्यांसह पालकांना ज्येष्ठ तमाशा कलावंताने केला आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका, असं आवाहन ज्येष्ठ तमासा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर टीका करताना केलं आहे.
Published on: Apr 09, 2023 07:24 AM