अहमदनगरमध्ये महिन्याभरात 8 हजार मुलांना कोरोनाची लागण, वाढत्या संसर्गामुळं चिंता वाढली
अहमदनगरमध्ये महिन्याभरात 8 हजार मुलांना कोरोनाची लागण, वाढत्या संसर्गामुळं चिंता वाढली
अहमदनगर: जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, त्यात 8881 मुले 18 वयोगटाच्या आतील आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित मुलांसाठी स्पेशल वार्ड तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.