किसान लॉंगमार्चचा धांदरफळमध्ये मुक्काम; पावसाची हजेरी, मोर्चेक-यांची धांदल
Dhandarphal Farmers Long March : किसान लॉंगमार्चचा धांदरफळमध्ये मुक्कामी; पावसामुळे आंदोलकांची तारांबळ, पाहा व्हीडिओ...
धांदरफळ, अहमदनगर : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी लॉंगमार्च काढला आहे. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवलेही या मार्चमध्ये सहभागी झाले आहेत.धांदरफळ इथं आज राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी हा लॉंगमार्च मुक्कामी आहे. या मुक्कामावेळी आंदोलक जेवण बनवत असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांची धांदल उडाली. यावेळी मोर्चेक-यांनी रामेश्वर मंदिराच्या मंडपाचा आधार घेतला. दरम्यान, विविध मागण्या घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनाची दखल घेतली आहे. अशात मंत्री आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत काय होतं? काही तोडगा निघतो का? पाहणं महत्वाचं असेल.
Published on: Apr 27, 2023 10:16 AM