जर्मनीचे नागरिक साईबाबांच्या चरणी; 40 भाविकांनी घेतलं दर्शन
जर्मनीतील 40 भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थानच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांचं आदरातिथ्य करण्यात आलं.
शिर्डी, अहमदनगर : शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून लोक येत असतात. परदेशी नागरिकही साईबाबांच्या दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळतं. आज जर्मनीतील नागरिकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. जर्मनीतील 40 भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं. जर्मनीहून आलेल्या 40 साईभक्तांनी दर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी या विदेशी पाहुण्यांचं स्वागत केलं. याप्रसंगी गेल्या 30 वर्षापासून शिर्डीत साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येत असल्याचं या साईभक्तांनी सांगितलं आहे..
Published on: Feb 08, 2023 03:40 PM