शेतकरी लॉंगमार्च: आदिवासीवाद्याच्या तालावर मोर्चेकऱ्यांनी धरला ठेका; पाहा व्हीडिओ…
Dhandarphal Farmer Longmarch : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट; पाहा व्हीडिओ...
धांदरफळ, अहमदनगर : विविध मागण्यांसाठी अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अकोले ते लोणी लॉंगमार्चचा आज दुसरा दिवस आहे. आज सरकार आणि आंदोलक यांच्यात बैठक असल्याने मोर्चेकरी धांदरफळमध्येच मुक्कामी आहेत. मात्र या वेळेत आंदोलकांनी आदिवासी परंपरा जोपासत पारंपरिक वाद्यांसह नृत्य सादर केलं. एकीकडे जेवणाची तयारी आणि दुसरीकडे आदिवासी नृत्य असा माहौल यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान, या आंदोलनातील मागण्यांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आंदोलकांच्या भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकिय अधिकारी आंदोलकांच्या भेटीला पोहोचले होते. मंत्र्यांशी होणा-या बैठकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांचा आढावा घेतला. धांदरफळ गावात मुक्कामी असलेल्या आंदोलकांचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलं.
Published on: Apr 27, 2023 02:59 PM