कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; कर्जतमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला

| Updated on: Apr 29, 2023 | 9:42 AM

Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांचा आज निकाल; कोण बाजी मारणार?, पाहा व्हीडिओ...

अहमदनगर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं सध्या वारं वाहतंय. राज्यभरातील 95 बाजार समित्यांचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अवघ्या राज्याचं या निकालाकडे लक्ष आहे. कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीचा आज निकाल आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत बाजार समितीच्या 18 जागांचा आज निकाल लागणार आहे. कर्जत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पॅनल कडून उभे राहिले होते. या राजकीय खेळीमुळे राम शिंदे यांनी रोहित पवारांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लगालं आहे.

Published on: Apr 29, 2023 09:40 AM
अमरावतीत कोणी गट राखला? खासदार बोंडे यांच्या करिष्मा चालला?…; काय झालं मविआचं?
कृषी बाजार समित्यांचा निकाल, कुणाला धक्का? कुणाचं वर्चस्व, बघा व्हिडीओ