“शर्टाच्या गुंडी एवढी नितेश राणे यांची उंची, ते नजरेला नजर मिळू शकत नाहीत”

| Updated on: Apr 19, 2023 | 8:55 AM

Sangram Jagtap on Nitesh Rane : नितेश राणे यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका; संग्राम जगताप यांचा नितेश राणेंना इशारा. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

अहमदनगर : भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. 2024 जवळ आहे जो आमदारांचा कार्यक्रम करायचा आहे तो एकदाच करून टाकू, असं नितेश राणे म्हणाले आहेत. त्याला संग्राम जगताप यांनी प्रत्युत्तर दिलंय. “अहमदनगर शहरात स्वाभिमान भाजपत विलीन केलेला एक आमदार आला. त्यांनी सांगितलं इथला स्थानिक आमदार नजरेला नजर मिळू शकत नाही. थोडा उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे नजरेला नजर मिळतच नाही. माझ्या शर्टाच्या गुंडी एवढीच त्यांची उंची असल्याने ते नजर मिळू शकत नाही”, असं संग्राम जगताप म्हणालेत. तर नजरेला नजर मिळवायची असेल तर कुठे यायचं ते त्यांनी सांगावं. त्याला आम्ही तयार आहोत. अहमदनगर शहरात अशा प्रकारची भाषा वापरण्याचॉं काम करू नये. अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असा इशाराच संग्राम जगताप यांनी दिला आहे.

Published on: Apr 19, 2023 08:54 AM
चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेरी वाघांचा दरारा; किमान 198 आणि कमाल 248 वाघांची नोंद
मंत्री संजय राठोड यांच्या खात्याची चौकशी करा; ‘या’ संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र