अहमदनगरमध्ये वादळी वा-यासह पावसाचा हाहा:कार; पिकांचं मोठं नुकसान, दोघांचा मृत्यू

| Updated on: Apr 29, 2023 | 10:04 AM

अहमदनगरमध्ये गारपीट; पिकं आणि घरांचं नुकसान, पाहा व्हीडिओ...

नेवासा, अहमदनगर : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतंय. वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. तर अहमदनगर जिल्हयात दोघांचा मृत्यू झालाय. अहमदनगर जिल्हयात नेवासा , राहाता , कोपरगाव , श्रीरामपुर तालुक्यातील अनेक गावात जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. नेवासा तालुक्यात विविध भागात गारांच्या पावसाने हजेरी लावली. नेवासा तालुक्यातील नेवासा शहरासह मुळाकाठ परिसरातील करजगाव, पानेगाव, शिरेगाव, वाटापुर, अंमळनेर, निंभारी, गोणेगाव, पाचेगाव, पुणतगाव, सोनईसह परिसरात ढगांचा गडगडाट, जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतपिकांसह फळबागांचं मोठ नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.

Published on: Apr 29, 2023 10:04 AM
नाशिक पिंपळगाव कृषी बाजार समितीत बनकर की कदम?, कोण मारणार बाजी?
नाशिकच्या शेतकऱ्यांची अवकाळी काही पाठ सोडेना, उभी पिके आडवी, बळीराजाचं अतोनात नुकसान