महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद अन् जयंत पाटलांचं वक्तव्य; सुजय विखे पाटील यांचं जोरदार टीकास्त्र

| Updated on: Apr 30, 2023 | 11:25 AM

Sujay Vikhe Patil On Jayant Patil : देशात भाजप आणि राज्यात भाजप शिवसेना युतीची सत्ता येईल, असा विश्वास डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पाहा व्हीडिओ...

राहाता, अहमदनगर : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यावरून भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हास्यास्पद विधानं बरी वाटतात. प्रसारमाध्यमांचे खर तर आभार मानले पाहिजेत एवढ्या तणावात ते आम्हाला हसवतायत. त्यांची इच्छा असेल माझ्या शुभेच्छा आहेतच. अनेकदा भावी मुख्यमंत्र्याबाबतचा विषय मी मांडलाय. स्वप्न बघायला हवीत जयंत पाटील यांनी आपल्या पक्षासाठी स्वप्न पाहिलं असेल तर काही हरकत नाही, असं सुजय विखे म्हणाले आहेत. आमच्या मतदारसंघात देखील भावी आमदार म्हणुन अनेकांचे पोस्टर लागतात. शेवटी इथं आम्हीच आहोत. लोक आम्हालाच निवडून देतात. लोकशाहीत अपेक्षा ठेवणं गैर नाही. राष्ट्रवादी तशी अपेक्षा ठेवत असले तर त्यांना शुभेच्छा. पण मतदार ठरवतील तेच होणार, तेच लोक निवडून येणार, असं सुजय विखे म्हणाले आहेत.

Published on: Apr 30, 2023 11:25 AM
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री अन् जयंत पाटलांच्या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांचा जोरदार निशाना
अवकाळी अन् गारपीटनं बळीराजा हतबल, आंब्याचा मोहोर गळाल्यानं शेतकरी चिंतेत