रोहित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाला कंटाळून लोक आमच्या पक्षात आले; राम शिंदे यांचा रोहित पवारांवर निशाणा

| Updated on: Apr 28, 2023 | 1:21 PM

Ram Shinde on Rohit Pawar : बाजार समितीच्या निवडणुकीवरून राम शिंदे यांचा रोहित पवारांवर निशाणा; म्हणाले...

अहमदनगर : राज्यभर बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. अहमदनगर जिल्हातील आज 7 बाजार समितीसाठी मतदान पार पडतंय. कर्जतमध्ये भाजप आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप आमदार राम शिंदे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवर भाष्य केलंय. बाजार समितीच्या निवडणुकीवरून राम शिंदे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. “रोहित पवारांच्या कार्यकर्तृत्वाला कंटाळून बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आणि उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्षांनी आमच्याकडे आले. आमच्या पॅनलमधून फॉर्म भरला, असं राम शिंदे म्हणाले आहेत. अडीच वर्षात महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नाही तर फसवणूक केली. आम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा नव्हती असा आरोप करत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जनता आता आम्हालाच निवडणून देणार आहे, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केलाय.

Published on: Apr 28, 2023 01:21 PM
अभिमानास्पद! मॉरेशियसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं फडणवीस यांच्या उपस्थित अनावरण
भाजपने कृत्रिम पद्धतीने महागाई वाढवली; काँग्रेसच्या नेत्याचा सरकारवर निशाणा