उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या अहंकारामुळेच राज्यही गेलं आणि पक्ष धुळीला मिळाला!; कुणाचं टीकास्त्र?

| Updated on: Apr 08, 2023 | 3:56 PM

Uddhav Thackeray : हिंदुत्वाचा विचार सोडल्याने उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने सावरकर दुय्यम झालेत; उद्धव ठाकरे यांच्यावर कुणी डागलं टीकास्त्र? पाहा सविस्तर...

शिर्डी, अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळे पक्ष संपवला. मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिली. सत्तेच्या अहंकारामुळेच राज्यही गेलं आणि पक्ष धुळीला मिळाला”, असं विखे पाटील म्हणालेत. राहुल गांधी सावरकरांचा अवमान करताय. उद्धव ठाकरे सभांमध्ये केवळ इशारा देतात आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात. हिंदुत्वाचा विचार सोडल्याने सावरकर त्यांच्या दृष्टीने दुय्यम झालेत. त्यांना केवळ सत्ता पाहिजे. मात्र राज्यातील जनतेने त्यांचे खरे रूप ओळखलंय. जनताच त्यांना धडा शिकवेल, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत.

Published on: Apr 08, 2023 10:20 AM
4 Minutes 24 Headlines | आदानींच्या चौकशीची गरज नाही : शरद पवार
गौतम अदानींचं कौतुक नाही, पण…; शरद पवार यांचं महत्वाचं वक्तव्य