मतदारसंघातील 29 कोटींची कामं अडवली, माझ्यावर अन्याय, सरकार जाड कातडीचं; निलेश लंके यांचे गंभीर आरोप
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यात राजकीय संघर्ष आता टोकाला गेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील विरूद्ध निलेश लंके छुपा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील विकास “माझी कामं कुणी अडवली हे सगळ्यांना माहिती आहे. पण मीही हट्टी माणूस आहे. जोपर्यंत निविदा निघत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. माझी 29 कोटी रुपयांची कामं अडवली गेली आहेत. राज्यातील सरकार जाड कातडीचं सरकार आहे. माझ्या मतदारसंघातील बंधाऱ्यांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे”, असं निलेश लंके म्हणाले आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर निलेश लंके आज शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहेत.
Published on: Mar 27, 2023 12:50 PM