Special Report | अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतरण होणार?

| Updated on: Jun 02, 2022 | 10:59 PM

पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले. त्याचबरोबर 'हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर' नाव बदलून 'अहिल्यादेवी नगर' करण्यात यावे असे म्हटलं आहे.

अहमदनगर : महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर त्याच्या नामांतरणाच्या राजकारणावरून सध्या चांगलेच चर्चेत आहे. आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच औरंगाबादचे नाव संभाजीनगर (Sambhajinagar) केले होते. त्यानंतर आता अहमदनगर शहराचेही नाव बदलण्यात यावे असा प्रस्ताव पुढे केला जात आहे. ‘अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर करा’ असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांची मागणी आहे. त्यासाठी पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले. त्याचबरोबर ‘हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ ( Ahilya Devi Nagar) करण्यात यावे. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल. जय अहिल्या, जय मल्हार’ असेही पडळकर यांनी म्हटलं होतं. तर ज्यावेळी राष्ट्रवादीचा कार्याक्रम सुरू होता त्यावेळी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना अडविण्यात आलं होतं. त्यावरूनही जोरदार टीका झाली होती. तर पडळकर यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले होते. तर नामामतरणाची यादी ही मोठी होत असून त्यात नगरचे नाव ही जोडले जात आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 02, 2022 10:59 PM
Special Report | औरंगाबादेत येण्याआधी मुख्यमंत्री Uddhav Thackeray अॅक्शन मोडमध्ये
Special Report | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अजित पवार यांची बोचरी टीका -tv9