AIMIM पक्षाचं खातं यंदा लोकसभेत उघडणार नाही, नवनीत राणा यांचा दावा

| Updated on: Mar 15, 2024 | 1:52 PM

एकीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपा पक्षश्रेष्टी जो आदेश देतील ते पाळू असे म्हणत आपली उमेदवारी कायम असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे या जागेवर महायुतीचे माजी खासदार आनंदराव अडसुळ किंवा अभिजीत अडसूळ हेच शिवसेनचे उमेदवार असतील असा या पिता-पूत्रांनी केला असल्याने या जागेवर कोणाला तिकीट मिळते याकडे लक्ष लागले आहे.

अमरावती | 15 मार्च 2024 : युवा स्वाभिनान पार्टीच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपण कालही एनडीएत होतो, उद्याही एनडीएतच असणार असल्याचे म्हटले आहे. नवनीत राणा यांचे नाव भाजपा उमेदवारांच्या यादीत असणार असल्याचा दावा केला जात होता. भाजपाची लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी आली आहे. पहिल्या दोन यादीत महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवारांची नावे जाहीर झालेली आहेत. केवळ मित्र पक्षांना जागावाटपाची बोलणी जेथे सुरु आहेत त्या वादाच्या जागांची घोषणा अद्याप झालेली नाही. नवनीत राणा यांनी आता आमच्या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा आणि आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील तो आम्ही पाळू असे म्हटले आहे. यंदा एमआयएमचे खाते देखील उघडणार नसल्याचा दावा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

Published on: Mar 15, 2024 01:51 PM
उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणूकांची घोषणा होणार, आचार संहिता लागू होणार
प्रदुषण रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा क्रांतीकारी निर्णय, लालपरी एलएनजीवर धावणार