इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा मोठा निर्णय
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित. इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा मोठा निर्णय
Iran-Israel War : इराण-इस्त्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. इराणमधील अनेक शहरांवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. इराणच्या फार्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या इसाफहान शहरातील विमानतळावर स्फोट झाले आहेत. त्यामुळे एअर इंडिया हा मोठा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.
Published on: Apr 20, 2024 10:40 AM