Vijaykumar Gavit : आदिवासी विकास मंत्र्यांचे अजब वक्तव्य; म्हणाले, ‘दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर’

| Updated on: Aug 21, 2023 | 12:37 PM

भाजपा नेते मंत्री विजयकुमार गावित हे नेहमीच आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आताही त्यांनी बॉलीवूड स्टारच्या बाबतीत एक दावा केला आहे. ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

मुंबई : 21 ऑगस्ट 2023 | राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित हे कोणत्या कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता देखील ते त्यांच्या अजब गजब वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. तर त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर यावेळी गावित यांनी थेट बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या डोळ्यांवरून हे विधान केलं आहे. त्यांनी, दररोज मासे खाल्ल्यानं ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल तर तुमचेही डोळे सुंदर होतील. त्यानंतर तुम्ही ज्याला पटवायचं त्याला पटवा असे गावित म्हणालेत.

Published on: Aug 21, 2023 12:37 PM
‘टाटा म्हणजे विश्वास, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचं काय?’ सामनातून शिंदे-फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाना
‘शरद पवार या एका नावामुळेच तुम्हाला…’; राऊत यांनी थेट वळसे-पाटील यांना आरसाच दाखवला