अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय…,’ काय म्हणाले अजय महाराज बारसकर

| Updated on: Feb 26, 2024 | 1:53 PM

मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपाची सुरुवात करणारे त्यांचे एकेकाळचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी पु्न्हा पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. जरांगे यांनी काल जो प्रकार केला त्यांनी त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे. आपल्या आरोपाचे खंडन देखील जरांगे यांनी केले नसल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट नाव घेत जोरदार टीका केली. त्यात त्यांनी फडणवीस आपल्याला सलाईनमधून विष देतील किंवा एन्काऊंटर करतील असा गंभीर आरोप केला होता. गेले काही दिवस जरांगे यांच्यावर आरोप करणारे अजय महाराज बारसकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोप केले. जरांगे हे अपरिपक्व नेते आहेत हे कालच्या घटनेने स्पष्ट झाले. मराठा आंदोलनाने त्यांना मिळालेला मान सन्मान नाहीसा झाला आहे. त्यांच्या हेकेखोरपणामुळे हे झाले आहे. त्यांनी आपल्यावर केलेल्या एकाही आरोपाचा पुरावा दिलेला नाही. मी केलेल्या आरोपाचे त्यांनी खंडन केलेले नाही. का घाबरत आहेत ते मला ? मला त्यांनी फडणवीस यांचा हस्तक म्हटले. 40 लाख घेतले म्हटले. 300 कोटीची संपत्ती असल्याचे म्हटले. परंतू काहीही पुरावे दिलेले नाहीत असे बारसकर यांनी म्हटले. कालपर्यंत त्यांच्याविरोधात कोणी बोलत नव्हता. आज सर्वजण त्यांच्या विरोधात बोलत आहेत. आपल्याकडून आडदांडपणा झाल्याची कबूली त्यांनी स्वत:च दिली आहे. दीड कोटीच्या समाजाचे नेतृत्व करणारे आज दोनशेवर आले. अख्ख्या समाजाची छी थू होत आहे.  काल अर्ध्या रस्त्यातून माघार घेण्याची आपला निर्णय बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याची टीका बारसकर यांनी केली आहे.

Published on: Feb 26, 2024 01:53 PM
WITT Global Summit : देशात AI किती मोठे चॅलेंज? आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात येणार?
WITT Global Summit : ‘या’ कंपन्यांना होणार फायदा, SBI चे माजी अध्यक्ष रजनीश कुमार बँकिंग सिस्टीमविषयी काय म्हणाले?