ज्या समाजाने देव केलं..तोच उद्या दगडं मारील, अजय महाराज बारसकर यांचा गंभीर आरोप

| Updated on: Feb 24, 2024 | 8:27 PM

मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारसकर यांनी आरोप केल्यानंतर दोघांमध्येच आर्थिक घोटाळ्यावरुन जुंपली आहे. मनोज जरांगे यांचा बुरखा फाडण्याची घोषणा आज बारसकर यांनी केली आहे. उद्या सकाळी अकरा वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत जरांगे यांचे सत्य बाहेर येणार आहे असा सनसनाटी दावा महाराज बारसकर यांनी केला आहे.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : मागच्या पत्रकार परिषदेत मी जरांगे यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप केला नव्हता. परंतू माझ्यावर आरोप केल्यानंतर आता मी तुमच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप करतोय. मी माझी नार्को अॅनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार आहे. जरांगे देखील या प्रकरणात स्वत:च्या या चाचण्या करण्याची तयारी दाखवावी. उद्या सकाळी 11 वाजता इथे बॉम्ब फुटणार आहे, हा सत्याचा बॉम्ब फुटणार आहे. ज्या समाजाने तुला देव केले तो समाज तुझं सत्य बाहेर आल्यानंतर तुला दगड मारील अशा शब्दात अजय महाराज बारसकर जरांगे पाटील यांच्यावर बरसले आहेत.

Published on: Feb 24, 2024 08:25 PM
‘ही अजितदादांची करामत, 40 वर्षांनंतर शरद पवारांना….,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
आव्हाडांनी तुतारी वाजवली पण… अमोल मिटकरी यांनी काय दिले ओपन चॅलेंज?