Ajit Pawar On Government | ‘या सरकारचा पायगूणच वाईट’ अजित दादांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला

| Updated on: Jul 31, 2022 | 5:35 PM

Ajit Pawar On Government | ग्रामीण म्हणीचा दाखला देत अजित पवार यांनी नव्या सरकारवर टीका केली आहे.

Ajit Pawar On Government | ग्रामीण म्हणीचा दाखल देत, ‘या सरकारचा पायगूणच वाईट’ असल्याचा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) लगावला. एक महिन्यापूर्वी राज्यात दोघांचं सरकार आलं नी महाराष्ट्रावर आरिष्ट ओढावल्याची टीका अजित पवार यांनी केली. विदर्भासह मराठवाड्यात अतिवृष्टीने (Heavy Rainfall) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर बीडमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या यावेळी प्रतिक्रिया जाणून घेतल्या. गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच गोगलगायीचं संकट शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं त्यांनी सांगितले. सोयाबीन पिकांवर गोगलगायींनी (Snails Attack) हल्ला चढवला आहे. एकिकडे अतिवृष्टी आणि दुसरीकडे गोगलगायींमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितले. बीड,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात गोगलगायींचा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. हा नव्या सरकारचा पायगूण असल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

इतर राज्यांच्या तुलनेत ईडीच्या कारवाया महाराष्ट्रातच अधिक का? नीलम गोऱ्हे
Ambadas Danve on Raut | शिवसैनिक घाबरत नसतो, जे सरेंडर झाले, त्यांनी गद्दारी केली अंबादास दानवे यांचा पुन्हा हल्ला