Ajit Doval: अजित डोवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या मुंबईमध्ये आहेत. ही भेट नेमकी कशासाठी आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ते मुख्यमंत्री शिंदे यांनाही भेटणार आहेत. काही वेळाआधीच डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंह कोषारी यांची भेट घेतली. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या मुंबईमध्ये आहेत. ही भेट नेमकी कशासाठी आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही भेट औपचारिक की अनऔपचारिक याबद्दल कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.
Published on: Sep 03, 2022 11:30 AM