Ajit Gavhale Pimpri Chinchwad: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य, शहराध्यक्ष पदावरून रुसवे-फुगवे!

Ajit Gavhale Pimpri Chinchwad: राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य, शहराध्यक्ष पदावरून रुसवे-फुगवे!

| Updated on: Aug 07, 2022 | 12:28 PM

पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अजित गव्हाळे यांना शहराध्यक्ष पद दिल्यामुळे जेष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Ajit Gavhale Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अजित गव्हाळे यांना शहराध्यक्ष पद दिल्यामुळे जेष्ठ नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर महेश बहल नाराज असल्याची माहिती सध्या मिळत आहे. कालच्या अजित पवारांच्या मेळाव्यालाही ते अनुपस्थित होते. विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या शहराध्यक्षपदाच्या तीन वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारणी नियुक्‍त करण्यात यावी, अशी मागणी होत होती. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष निवडीवरून राजकारण सुरू होते. वाईट काळात साथ दिल्याने संजोग वाघेरे यांनाच पदावर ठेवावे अशी मागणी एका गटाने केली होती. त्यामुळे चार महिने या पदास खोडा बसला होता.

Published on: Aug 07, 2022 12:28 PM
आज Friendship Day!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन मित्रांनी एकत्र यावं- शहाजीबापू पाटील
Uday Samant: राजकारण हे आरोग्यदायी असले पाहिजे असे उद्धव ठाकरेच म्हणायचे- उदय सामंत