Ajit Nawale | केंद्रीय कृषी कायदे मुळातून रद्द करण्याची भूमिका घ्या, अजित नवलेंचं सरकारला आवाहन

Ajit Nawale | केंद्रीय कृषी कायदे मुळातून रद्द करण्याची भूमिका घ्या, अजित नवलेंचं सरकारला आवाहन

| Updated on: Jul 03, 2021 | 8:07 PM

सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांविरुद्ध राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात ठराव करून याबाबत ठाम व स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. (Ajit Nawale appeal government to take the role of repealing the Central Agricultural Act radically)

मुंबई : केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे मूलत: शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे असल्याने हे कायदे संपूर्णपणे रद्द करावेत व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा यासाठी दिल्लीच्या सीमेवर गेली सात महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची या कायद्यांच्या विरोधातील लढाई आता निर्णायक वळणावर आली असल्याने या पक्षांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडी सरकारने केंद्रीय कृषी कायद्यांविरुद्ध राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात ठराव करून याबाबत ठाम व स्पष्ट भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.

Breaking | अनिल देशमुखांना ईडीकडून तिसरं समन्स मिळालं नाही, देशमुखांच्या वकीलांचा दावा
Mumbai | इंधन दरवाढ, महागाईमुळे नागरिक त्रस्त, दक्षिण मुंबईत राष्ट्रवादीचे घोषणाबाजी देत आंदोलन