सत्तेत येताच भर कार्यक्रमात अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी? गिरीश महाजन यांना म्हणाले, ‘जरा लक्ष द्या?’
यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत भाषण केलं. यावेळी त्यांनी त्यांचा भाषणाची सुरवात आहराणी बोलून केली. तर शासन आपल्या दारी कार्यक्रमातून कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत असल्याचे म्हटलं.
धुळे : राज्याच्या राजकारणात भूकंप आणत अजित पवार यांनी सत्तेत जाणं पसंत केलं. त्यानंतर त्यांनी नागपूर आणि आता धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत भाषण केलं. यावेळी त्यांनी त्यांचा भाषणाची सुरवात आहराणी बोलून केली. तर शासन आपल्या दारी कार्यक्रमातून कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेला मिळत असल्याचे म्हटलं. तर भारताला मार्गदर्शक ठरेल असे शासन आपल्या दारी हा उपक्रम होणार असल्याचे त्यांनी म्हटलं. मात्र याचं दरम्यान त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भर सभेत आपली नाराजी व्यक्त करत खोचक टोला लगावला. शासन आपल्या दारी कार्यक्रमात भव्य मंडप बघून त्यांनी इतका मोठा मंडप बघीतला नव्हता. मात्र नियोजन चांगले झाल्याचे सांगत महाजन आता तीन पक्षांचे सरकार आहे. मी देखील पालकमंत्री बनणार आहे. सध्या उपमुख्यमी आहे. जसे येथे भाजप शिवसेनेचे झेंडे लावले तसे राष्ट्रवादीचे देखील झेंडे लावा, असा जोरदार टोला लगावला आहे.