अर्थमंत्री होताच अजितदादा अॅक्शन मोडमध्ये; राष्ट्रवादीच्या आमदारांवर केला निधीवर्षांव!
अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी आपल्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे .शिंदे गटाच्या आमदारांना निधी देऊन त्यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी आपल्या आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे .शिंदे गटाच्या आमदारांना निधी देऊन त्यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे. अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या विकास कामांसाठी 1 हजार 500 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्यात आमदारांसाठी 25 ते 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र शरद पवारांसोबत असणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी निधी मंजूर झालेला नाही. तर जयंत पाटल्यांच्या सतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून अजितदादांकडून साऱ्यांनाच धक्का देण्यात आला आहे.