‘ही दोस्ती तुटायची नाय…’, फडणवीस, अजितदादांना समर्थकांकडून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

| Updated on: Jul 22, 2023 | 9:43 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. दरम्यान, नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.

नागपुर, 22 जुलै 2023 | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज एकाच दिवशी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना राज्यभरातून शुभेच्छा येत आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. दरम्यान, नागपुरात लावण्यात आलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘ही दोस्ती तुटायची नाय’, असे बॅनर्स लावून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नागपूरमधील अजित पवार गटाकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. नागपुरच्या सेंट्रल एवेन्यूवर हा बॅनर पाहायला मिळत आहे.

 

Published on: Jul 22, 2023 09:43 AM
राज्याच्या सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला ‘या’ जिल्हापरिषदेत भाजप लावणार सुरूंग?
उद्धव ठाकरे यांना नागपूरात उत्तर; कलंक की भुषण? थेट ठाकरे यांना होर्डिंग्जमधून सवाल?