“पाडापाडीचं राजकारण खपवून घेतलं जाणार नाही”, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भरला दम
विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमी आपल्या आक्रमक स्वभामुळे ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. त्याचं बोलणं हे समोरच्याला दम भरणारं असतं. धुळ्यातही त्याचाच प्रत्यय आला.
धुळे : विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमी आपल्या आक्रमक स्वभामुळे ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. त्याचं बोलणं हे समोरच्याला दम भरणारं असतं. धुळ्यातही त्याचाच प्रत्यय आला. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी अजित पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दम दिला. ते म्हणाले की, “अंतर्गत वादामुळे धुळ्यात राष्ट्रवादीचं नुकसान झालं, त्यामुळे पक्षात पाडापाडीचं राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं पाहिजे”.
Published on: Jun 16, 2023 10:36 AM